Posts

Showing posts from 2019

भाषा - पाया संस्कृतीचा आणि सुरुवात उज्वल आणि ज्ञानयुक्त परंपरांची

Image
                             भारतातील प्रत्येक माणसामध्ये समजूतदारपणा असायला हवा . कारण , प्रत्येक गोष्ट ही समजुतीवरच आधारित असते . आज आपल्या देशातील सर्वात मोठा जो मुद्दा आहे , तो आहे भाषेचा . भारतातील प्रत्येक जण , प्रत्येक व्यक्ती आपापली भाषा जपण्यासाठी धडपड करत आहे आणि ती धडपड करणं , ही देखील महत्वाची गोष्ट आहे . कारण प्रत्येक व्यक्तीचा या देशावर तितकाच अधिकार असतो जितका ह्या देशाच्या राष्ट्रप्रमुख ह्या देशावर असतो . तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या प्रांतात आहे , हे महत्त्वाचं नसतं . अनेक वेळा मी अनेक लोकांना विचारलं की , आपली राष्ट्रभाषा कोणती आहे ? तर ते उत्तर हिंदी देतात . पण खरं तर हे आहे की आपल्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये , हे त्यांना माहीतच नाहीये . भारतीय संविधानातील कलम ३४३ नुसार भारत हा विविध राज्यांचा , भाषांचा मिळून बनलेला देश आहे .  त्यामुळे प्रत्येक प्रदेशात , प्रत्येक राज्यात बोलली जाणारी त्या प्रदेशाची , त्या राज्याची राज्यभाषा ही तितकीच महत्त...