भाषा - पाया संस्कृतीचा आणि सुरुवात उज्वल आणि ज्ञानयुक्त परंपरांची

             

               भारतातील प्रत्येक माणसामध्ये समजूतदारपणा असायला हवा . कारण , प्रत्येक गोष्ट ही समजुतीवरच आधारित असते . आज आपल्या देशातील सर्वात मोठा जो मुद्दा आहे , तो आहे भाषेचा .

भारतातील प्रत्येक जण , प्रत्येक व्यक्ती आपापली भाषा जपण्यासाठी धडपड करत आहे आणि ती धडपड करणं , ही देखील महत्वाची गोष्ट आहे . कारण प्रत्येक व्यक्तीचा या देशावर तितकाच अधिकार असतो जितका ह्या देशाच्या राष्ट्रप्रमुख ह्या देशावर असतो . तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे आणि कोणत्या प्रांतात आहे , हे महत्त्वाचं नसतं . अनेक वेळा मी अनेक लोकांना विचारलं की , आपली राष्ट्रभाषा कोणती आहे ? तर ते उत्तर हिंदी देतात . पण खरं तर हे आहे की आपल्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये , हे त्यांना माहीतच नाहीये .

भारतीय संविधानातील कलम ३४३ नुसार भारत हा विविध राज्यांचा , भाषांचा मिळून बनलेला देश आहे .  त्यामुळे प्रत्येक प्रदेशात , प्रत्येक राज्यात बोलली जाणारी त्या प्रदेशाची , त्या राज्याची राज्यभाषा ही तितकीच महत्त्वाची असते जेवढी एखाद्या देशाची राष्ट्रभाषा .
              आज अनेकजण हिंदी बोलतात म्हणून ती आपली राष्ट्रभाषा आहे हे मानने चुकीचे आहे .

जर आपण प्रत्येक राज्याच्या राज्य भाषेचे संवर्धन केले नाही तर , काही दिवसांनी ती भाषा ती संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या भाषेमध्ये असणारा इतिहास हा नामशेष होणार आहे . आणि कालांतराने ती संस्कृतीही नष्ट होईल . माझं कोणत्याही राज्याशी , कोणत्याही धर्माशी , जातीशी आणि नाही कोणत्या भाषिकांशी माझं वैयक्तिक असं वैर आहे . माझं फक्त इतकेच सांगणे आहे की आपल्या राज्याची भाषा , संस्कृती जपा कारण आपली खरी ओळख तीच आहे . आणि दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा दुसऱ्या राज्यांमध्ये जाता तेव्हा तिथल्या भाषेचा तितकाच आदर करा , जितका तुम्ही तुमच्या आई-वडिलांचा , तुमच्या मातृभाषेचा करता . जर तुम्हाला एखाद्या राज्यात जायचं असेल , तर तिथली भाषा शिकून घ्या आणि मग जा , कारण त्यामुळे तिथल्या संस्कृतीचे आणि भाषेचे संवर्धन होईल आणि त्याच अनुषंगाने आपलेही .
                इथे अजून एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो तो असा की ,  राष्ट्राला राष्ट्रभाषा नसेल तर , त्या राष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाला , एकतेला तडा जातो .

हो हा मुद्दाही तितकाच बरोबर आणि महत्त्वाचा आहे म्हणून राष्ट्राला राष्ट्रभाषा असायला हवी . पण ती कुणा एका राज्याची राज्यभाषा नव्हे .  जर आज आपण कोणत्याही एका राज्याच्या राज्य भाषेला आपल्या देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करू इच्छित असाल , तर देशातील इतर राज्यांवर , इतर भाषिकांवर एक प्रकारचा अन्याय आहे . एक प्रकारचा बहुजनांना कडून दुर्बल घटकांवर केलेला तो अन्याय आहे असे म्हणता येईल . म्हणून जर हा अन्याय नको असेल , तर आपण आपली प्राचीन भाषा जीला देवभाषा या नावानेही संबोधले जाते अशा या प्राचीन संस्कृत भाषेला आपल्या देशाची राष्ट्रभाषा बनवायला हवी .
                 पण येथे एक समस्या पुढे येते ती म्हणजे , संस्कृत भाषेला ही विरोध करणारे अनेक लोक आपल्या राष्ट्रामध्ये आहेत . जे विचार करतात की ,

संस्कृत ही भाषा ब्राह्मण समाजाची आहे .  पण मी त्यांना एक सांगू इच्छितो की , असं कुठेही लिहिलेलं आहे , की संस्कृत ही भाषा फक्त ब्राह्मण समाजाची संपत्ती आहे . जर तुम्ही तिला फक्त ब्राह्मण समाजाची संपत्ती मानत असाल ,  तर तुम्हाला शिक्षण घेण्याचा देखील कोणत्याही प्रकारचा अधिकार नाहीये . कारण शिक्षणाचा अधिकार हा देखील ब्राह्मण समाजाला होता , जर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण नाहीये , तर आपल्या देशाची राष्ट्रभाषा संस्कृतला करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण का असायला हवी?
                 आज संस्कृत ही भाषा संपूर्ण भारतामधून नामशेष होत चालली आहे . पण संस्कृत हीच भाषा बाहेरच्या देशांमध्ये शिकवली जात आहे .

कारण बाहेरच्या लोकांना कळाले आहे की , ह्या भाषेत खरंच ज्ञान आहे आणि ते आहेच कारण अनेक प्राचीन ग्रंथ असो , अनेक पुराण असो हे संस्कृत भाषेतच लिहिले गेलेले आहेत आणि जगातील सर्वात जास्त शुद्ध आणि सर्वात प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेलाच ओळखले जाते . आज जर्मनीमध्ये १४ विद्यापीठांअंतर्गत संस्कृत या भाषेचे शिक्षण दिले जात आहे त्याच प्रमाणे स्वीडन असो स्पेन असो फ्रेंच असो नाहीतर अमेरिका असो या सर्व विकसित देशांमध्ये संस्कृत ही भाषा  शिकवली जात आहे .
                  मध्यंतरी झालेल्या एका संशोधनामध्ये असं सिद्ध झालं आहे की ,

संगणकासाठी सर्वात सरळ आणि सोपी जी भाषा आहे  ती संस्कृत आहे . म्हणून मला असं वाटतं आहे की , जर आपल्याला आपल्या देशाचा खरा विकास करावयाचा असेल आणि आपल्या भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायचे असेल तर संस्कृत ही आपली राष्ट्रभाषा व्हायला हवी आणि ती लवकरच होईल अशी मला आशा आहे , कारण आज प्रत्येक जण जुन्या गोष्टींकडे वळत झालेला आहे , जुन्या गोष्टींचं , जुन्या विचारांच महत्त्व माणसाला हळूहळू कळत चाललेलं आहे . त्यामुळे हळूहळू त्याला आपल्या भाषेचा , आपल्या संस्कृतीच महत्त्वदेखील कळेल हीच आशा माझ्या मनामध्ये आहे .
                  तरीही तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करायला हवा कारण हात वर केल्या बिगर घंटा पण वाजत नाही ,

आणि म्हणून आपल्या देशाला पुन्हा या जगाचा विश्वगुरू बनवायचं असेल तर आपण आज प्रयत्न करायला हवा .
                 विकसनशील भारताला पुन्हा या जगाचा विश्वगुरू बनवण्याच्या दृष्टीने तुम्ही हे छोटस योगदान द्याल हीच अपेक्षा .......



                       वंदे मातरम जय भारत .....

Comments

Popular posts from this blog

IS THERE SOMEONE